आकर्षक व्यक्तिमत्त्व (Improved Personality)

मानसिक आरोग्य 

 व्यक्तिमत्व परिवर्तन 

Personality Development 


व्यक्तिमत्वात परिवर्तन कसे करावे ?

व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या विचारांची, कृतीची आणि भावनांची एकत्रित रचना असते. काही लोक जन्मतःच देखणे आणि आकर्षक व्यक्तिमत्व घेऊन येतात, तर काहींना ते प्रयत्नपूर्वक विकसित करावे लागते. आपण आपल्या वर्तनात आणि विचारसरणीत योग्य बदल करत राहून आपले प्रभावी व्यक्तिमत्व अधिक विकसित करू शकतो.

व्यक्तिमत्व म्हणजे काय?

• व्यक्तिमत्व हा एखाद्या व्यक्तीच्या विचारांचा, भावनांचा आणि सर्व कृतींचा एक गृप असतो. त्यामध्ये आपल्या संभाषण कौशल्यांपासून आत्मविश्वासापर्यंत सर्वकाही समाविष्ट असते. व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी आणि समाजात इंप्रेसिव पर्सनालिटी म्हणून ओळखले जाण्यासाठी  काही गोष्टींचा अभ्यास आणि  सतत सराव आवश्यक ठरतो.

व्यक्तिमत्व सुधारण्याचे प्रभावी उपाय कोणते?

१. आपण आपले आत्मपरीक्षण करायला हवे (Self-Analysis)

व्यक्तिमत्व सुधारायचे असेल, तर आधी स्वतःला समजून घेणं फार आवश्यक असतं. आपल्यातल्या  गुण दोषांची मनातल्या मनात एक यादी करून त्यावर परिश्रम घेण्याची आणि आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्याची  आपली खरी तयारी तिथुनच सुरु होते.

• आत्मपरीक्षण केल्याने आपण स्वतःची कोणत्या क्षेत्रात सुधारणा करायला हवी हे आपले आपल्याला सहज लक्षात येईल.

• रोज १०-१५ मिनिटे स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते. आपल्या सुख दुःखाचे खरे साक्षीदार आपले आपणच असतो.

• स्वतः च्या सकारात्मक आणि नकारात्मक सवयी ओळखुया. त्यात नेहमी सुधारणा करत रहाणं गरजेचं असतं. कारण स्वतःची एक नवीन आवृत्ती (ऍडवान्स वर्जन) फक्त आपणच निर्माण करू शकतो.

उदा. आपली भाषा, बोलण्याची पद्धत, हसरा चेहरा अनेक गोष्टी आपण ठरवून बदलू शकतो. सुधारणा आणू शकतो.

  २. आपण आपला आत्मविश्वास वाढवुया
(Boost Self-Confidence)

आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरील विश्वास. जेव्हा आपला स्वतःवर विश्वास असतो, तेव्हा नक्कीच लोक आपल्याकडे आकर्षित होतात. हे समाजात वावरताना अनुभवायला मिळतं.

 स्वतःला सतत सकारात्मक विचारांमध्ये ठेवुया.
• नवीन कौशल्ये शिकत त्यावर सराव करूया.
• आपणच आपल्या वागण्या बोलण्यावर आणि देहबोलीवर (Body Language) लक्ष ठेवुया.
• चांगल्या सवयी अंगीकारूया, जसे की वेळेचे नियोजन (Time Mangement), संयम, आणि नम्रता.

३. संवाद कौशल्य सुधारूया
 ( Communication Skills)

• चांगला संवाद म्हणजे व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोलणे हे समाजात प्रभावी व्यक्तिमत्वाचे लक्षण असते.
• आप्त स्वकियांशी संपर्क ठेवून सतत संभाषण करत राहूया.
• योग्य वेळी इतरांना योग्य मार्गदर्शन करणे आणि मागितला तरच अनुभवाचा सल्ला देणे यातून हितसंबंध मजबूत बनवण्याचा प्रयत्न करूया.

स्वतः त बदल आणायला हवेत:

• वाचनाची सवय लावून घेऊया. विविध पुस्तके, वर्तमानपत्रे, लेख वाचन करत राहूया जेणेकरून आपण नव्या ज्ञानाच्या सतत संपर्कात राहू शकू.

• शब्दसंग्रह (Vocabulary) वाढवत राहूया आणि योग्य शब्द योग्य जागेवर वापरण्याचा सराव करूया.
• मनापासून ऐकण्याची कला (Active Listening) शिकुया. प्रत्येकाला आपलं मत ऐकणारा एक श्रोता हवा असतो.
• समोरच्याचं बोलणं शांतपणे ऐकुन मागितला तरच सल्ला देऊया. 
• सकारात्मक दृष्टीकोन ठेवत जाऊया (Develope a Positive Attitude) सकारात्मक विचार हे आपलं व्यक्तिमत्व सुधारण्यास सदैव मदत करतात. 
• सतत तक्रार करणे किंवा नकारात्मक विचार करणे टाळून फक्त सकारात्मक विचारसरणी (Positive Thinking) ची संगत ठेवुया.
• अपयश आल्यानंतरही पुन्हा शिकण्याची वृत्ती हिंमत ठेवुया.

४. उत्तम देहबोली ठेवुया (Positive  Body Language)

• आपली देहबोली (Body Language) आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. उंच मानेने चालणे, डोळ्याला डोळा भिडवून संपर्क ठेवणे आणि उत्साही राहणे हे प्रभावी व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे.
• ताठ बसणे आणि आत्मविश्वासने उभे रहाणे महत्त्वाचे. मरगळलेली बॉडी लँग्वेज टाळुया.
• हात हलवण्याची आणि हावभाव दाखवण्याची योग्य पद्धत शिकुन घेऊया. बोलताना डोळ्यात पाहून बोलण्याचे स्कील शिकुन आचरणात आणुया.

• चेहऱ्यावर योग्य भावना असु द्यायच्या आहेत. कारण कृती शब्दांपेक्षा मोठ्याने बोलते (Action Speaks More Louder than Words)

५. वेळेचे योग्य नियोजन करायचे आहे 
(Time Mgmt.)

यशस्वी लोक त्यांच्या वेळेचा योग्य वापर करतात. वेळेचे व्यवस्थापन केल्याने आपले काम टापटीप होते आणि त्या  कामात एक प्रकारची शिस्त दिसून येते.
• रोजच्या कामांची यादी (To-Do List) तयार करत जाऊया
• अनावश्यक गोष्टींवर वेळ वाया घालवणं बंद करूया.
• वेळेचे योग्य नियोजन करून ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करत जाऊया.

६. नवनवीन कौशल्ये शिकुया ( New Skills)

नवीन कौशल्ये शिकल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होते. तंत्रज्ञान, कला, संगीत, लेखन, सफाईदार इंग्लिश बोलणे यांसारखी कौशल्ये आपण नियमित शिकल्याने आपल्याला समाजात  एक आदर  मिळतो

७. चांगली माणसे जोडूया (Surround Oneself with Good People)

आपल्या आजूबाजूची माणसे व त्यांचे वर्तन आपल्या व्यक्तिमत्वावर  सतत परिणाम करत असतात. आपण   स्वच्छ विचारांच्या सकारात्मक, उत्साही आणि प्रेरणादायक लोकांच्या सहवासात आहोत ना याची नोंद घेऊया.

• आपण नियमित स्वतः वर लक्षं ठेवून स्वतःत परिवर्तन करत रहायला हवं.
• अशा लोकांसोबत राहूया जे आपल्याला सतत हिम्मत देतील.
• नकारात्मक आणि निराशाजनक लोकांपासून स्वतःला कायम दूर ठेवुया.

८. सतत स्वतःला सुधारत राहायचे आहे (Keep Improving Yourself)

व्यक्तिमत्व सुधारणा ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत सतत चालणारी प्रक्रिया आहे. दररोज स्वतःला थोडेसे सुधारण्याचा कायम  प्रयत्न करत राहूया.

निष्कर्ष.
• व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी वेळ आणि प्रयत्न दोन्ही घटक आवश्यक असतात. ती एक दोन दिवसात पार होणारी प्रक्रिया नव्हे.

•आत्मविश्वास, उत्तम संवाद, सकारात्मक विचार, वेळेचे नियोजन आणि नवीन कौशल्ये आत्मसात करणं या सर्व गोष्टींचा सराव केल्यास आपल्या व्यक्तिमत्वात निश्चित सुधारणा झालेली जाणवते. नियमित सराव, चांगली माणसे, आणि सतत शिकण्याची वृत्ती हे प्रभावी व्यक्तिमत्वाचे मुळ आहे.

• शुभेच्छा.🌹

• गुगलचे आभार.

Comments