उन्हाळ्यात कशी घ्यावी प्रकृतीची काळजी (Health Tips for Summer Season)
Healthy Tips for Summer Season
उन्हाळ्यात प्रकृतीची काळजी कशी घ्याल ?
उन्हाळा सुरू होताच वाढत्या तापमानामुळे शरीरावर आणि आरोग्यावर परिणाम होतो. घाम, थकवा, डिहायड्रेशन, त्वचेच्या समस्या आणि उष्णतेचे आजार टाळण्यासाठी काही सवयी लावून घेतल्या पाहिजेत. आज आपण उन्हाळ्यात आरोग्य, आहार आणि दिनचर्या कशी असावी याविषयी माहिती घेऊया.
१. शरीराला हायड्रेटेड ठेवा.
* उन्हाळ्यात जास्त घाम येत राहतो त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत राहते. आणि म्हणूनच भरपूर पाणी आठवणीने दिवसभर पित रहा.
* कोकम सरबत, लिंबूपाणी, नारळ पाणी, ताक आणि फळांचे रस यांचा आहारात समावेश करा. जेणेकरून शरीरात ओलसरपणा कायम टिकून राहील.
* आंबा, टरबूज, खरबूज, संत्री, पपई, डाळिंब यांसारखी रसरशीत फळे खा.
* तेलकट, तळलेले पदार्थ आणि मसालेदार अन्न शक्य होईल तितके कमी खा.
* पचायला जड आणि गरम प्रकृतीचे पदार्थ पूर्णपणे टाळा; त्याऐवजी फळे आणि कोशिंबिरी खा.
३. हलके आणि आरामदायक कपडे घाला.
* उन्हाळ्यात सुती कपडे परिधान करा.
* घट्ट आणि सिंथेटिक कपडे पूर्णपणे टाळा, कारण ते घाम शोषून घेत नाहीत आणि त्वचेच्या समस्या वाढू लागतात.
४. त्वचेची काळजी घ्या
* उन्हाळ्यात त्वचा कोरडी किंवा तेलकट होऊ शकते. त्यामुळे काही खबरदारी घ्यावी लागते.
* घराबाहेर पडताना आठवणीने सनस्क्रीन वापरा.
* चेहरा स्वच्छ आणि ओलसर राहील हे बघा.
* गुलाबपाणी, कोरफड जेल किंवा घरगुती फेसपॅक नियमित वापरा.
५. योग्य व्यायाम आणि योगाभ्यास करा.
* उन्हाळ्यात जड आणि कठीण व्यायाम टाळा.
* सकाळी लवकर किंवा संध्याकाळी व्यायाम करा. *योगासनांमुळे शरीर ताजेतवाने राहते आणि उष्णतेपासून बचाव होतो.
६ .पुरेशी झोप घ्या
* झोप अपुरी राहिली तर उन्हाळ्यात थकवा जाणवतो आणि शरीर दमते. शांत निवांत झोप घ्या.
* उन्हाळ्यात रात्री उशिरा झोपणे आणि पहाटे लवकर उठणे खूप फायदेशीर ठरते.
* शांत झोप मिळावी यासाठी स्वच्छ आणि थंडगार खोलीत झोपा.
७. उष्णतेचे आजार टाळा
* उष्णतेचा ताप (हीटस्ट्रोक) टाळण्यासाठी उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव होण्यासाठी दुपारच्या वेळी (१२ ते ३) शक्यतो घराबाहेर पडू नका.
* बाहेर गेल्यास टोपी, गॉगल आणि छत्री आठवणीने वापरा.
८. घर नैसर्गिकरित्या थंड ठेवण्याचा प्रयत्न करा.
* घरात पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे पडदे वापरा.
* मातीच्या मडक्यात पाणी ठेवा, त्यामुळे घरातील वातावरण सतत थंड राहते.
* घरात छोटी छोटी झाडे लावा, कारण झाडांमुळे तापमान नियंत्रणात राहते.
९. उन्हाळ्यातील आजार टाळण्यासाठी स्वच्छता ठेवा
* स्वच्छ आणि ताजे अन्न खा.
* गोड पेय पदार्थ आणि बर्फाचे सरबत कमी प्या, कारण यामुळे घसा खवखवणे आणि सर्दी होण्याची शक्यता निर्माण होते.
* घाम आणि अस्वच्छता यामुळे त्वचेला सहजच संसर्ग होऊ शकतो
*त्यामुळे दररोज सकाळ संध्याकाळ आंघोळ करा. घामापासून मुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
१०. मानसिक तणाव टाळा आणि ताजेतवाने राहा
* उन्हाळ्यात गरम हवामानामुळे चिडचिड होते. तणाव दूर ठेवण्यासाठी ध्यानधारणा (मेडिटेशन) करा.
* हलके फुलके संगीत ऐका.
*ताजेतवाने राहण्यासाठी भरपूर विश्रांती घ्या.
* शांत वातावरणात वेळ घालवा.
निष्कर्ष
✓ उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी घेत रहा.
✓ हलका फुलका योग्य आहार, पुरेसे पाणी, हलके कपडे, व्यायाम आणि स्वच्छता या गोष्टी केल्यास आपण उन्हाळ्याचा आनंद घेऊ शकतो.
✓ शरीर सुदृढ आणि ताजेतवाने राहील. उन्हाळ्याचाही आनंद मनमुराद लुटता येईल.
तुम्ही उन्हाळ्यात कोणत्या खास सवयी पाळता? तुमचे अनुभव खाली कमेंट मध्ये शेअर करा !
गारेगार उन्हाळ्याच्या सुंदर सुंदर शुभेच्छा.
धन्यवाद.
Comments
Post a Comment