व्यसनमुक्ती (Addiction Rehabilitation)

शारीरिक आरोग्य 




व्यसनाधीनता कशी घालवायची ?

व्यसन म्हणजे नेमकं काय ?

व्यसन म्हणजे एखादी गोष्ट (खाणे, पिणे, सवयी इ.) पुन्हा पुन्हा कराविशी वाटणे. व्यसन हा शब्द विशेषतः वाईट सवयीं विषयी बोलताना वापरला जातो.

  व्यसन कसे जडते ?

व्यसनांमुळे मादक पदार्थ पोटात गेल्यावर त्यातील नशादायक पदार्थ शरीरातील रक्तवाहिन्यां व्दारे संपूर्ण शरीरात पसरतात. जेव्हा नशेचा असर संपतो तेव्हा शरीर  पुन्हा पुन्हा तो पदार्थ  मागत राहते. ही गोष्ट वारंवार होत राहते. यालाच व्यसन जडणे असे म्हणतात.


व्यसन-कारक पदार्थ कोणते आहेत ?

१) अफू २) कोकेन ३) गांजा ४) तंबाखू ५) ताडी
५) दारू ६) बीडी-सिगारेट ७) ब्राऊन शुगर 
६) भांग ७) मॉर्फिन ८) हशीश ९) हेरॉईन इ.

व्यसनांचे  दुष्परिणाम कोणते आहेत

• व्यसनांचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम.
• सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम.
• वैयक्तिक व कौटुंबिक दुष्परिणाम.
• मानसिक व अध्यात्मिक दुष्परिणाम.


यातील अनेक घटकांवर या व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम झालेले  दिसून येतात.

१. शारिरीक व मानसिक दुष्परिणाम:

• दात, घसा, फुफ्फुसे, ह्रदय, जठर, मुत्रपिंड,  श्वसनसंस्था, पचनसंस्था यांचे आजार उद्भवतात.

• तंबाखूच्या सतत सेवनातून घशाचा, फुफ्फुसांचा, पोटाचा, किडनीचा, मुत्राशयाचा कॅन्सर होऊ शकतो.

• दारू सतत पित राहिल्याने पोटदुखी, ऍसिडिटी, अल्सर, अंतर्गत रक्तस्त्राव, ह्रदयाचे व यकृताचे आजार होतात.

• स्मरणशक्ती कमी होत जाणे, मानसिक एकाग्रता कमी होत जाणे, मनाने खचत जाणे, स्वतःचे विचार, भावना, इच्छा या गोष्टींवरचे नियंत्रण कमी होत जाणे या त्यांचे प्रमाण हळूहळू वाढत राहते 

• चिडचिड वाढणे, काम-क्रोध- लोभ-मोह-मद-मत्सर या 
सहा शत्रूरुपी वाईट सवयींचे  प्रमाण वाढणे, अनामिक भीती, वैफल्यग्रस्तता (frustration), संशयीपणा या गोष्टी वाढत जातात.

२. सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम:

• व्यसनांमुळे आरोग्य सेवांवर मोठा भार येतो. सरकारला व्यसनमुक्ती केंद्रांसाठी आणि आरोग्य सेवांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करणे अनिवार्य ठरते.

• समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती बळावते, सामाजिक आरोग्य धोक्यात येते. भांडणे, मारामाऱ्या यांतून माणसाची तसेच कुटुंबातील सदस्यांची समाजात नाचक्की होत रहाते.



• चोरी, फसवणूक, हिंसाचार, बलात्कार यांसारखे गुन्हे समाजात वाढताना  दिसून येतात.

• वैयक्तिक रित्या माणूस व्यसनां करिता सामान्य खर्च समजून दररोज खर्च करत सुटतो. जो क्षुल्लक वाटणारा खर्च नंतर भीषण स्वरूप धारण करतो.

• व्यसनांमुळे व्यक्तिची एकंदरीत कार्यक्षमता कमी होत जाते. या गोष्टींमुळे त्याचे उत्पन्न (income) घटत जाते. कधी कधी नोकऱ्या जातात. कमाई थांबते, साठवलेला पैसा संपतो आणि परिस्थिती दयनीय होते.

• आरोग्याच्या समस्या डोकं वर काढतात. कधी कधी कर्करोग, हृदय विकार, लिव्हरच्या तक्रारी उद्भवतात आणि वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणात डोकं वर काढतो.

३. वैयक्तिक व कौटुंबिक दुष्परिणाम:

• व्यसनांत बुडालेला माणूस कुटूंबातील गरजांकडे सतत दुर्लक्ष करत राहतो.

• व्यसने भागविण्यासाठी समाजात, मित्रांत, नातेवाईकांमध्ये, ऑफिसमध्ये पैसे मागायला सुरुवात करतो. प्रतिष्ठा गमावतो. माणसं त्या व्यक्तीला टाळू लागतात. त्याच्या कुटूंबातील सदस्यांना देखील टाळले जाते.



• आर्थिक तणाव आणि समाजात होणारी बदनामी, अपमान, चर्चा, टोमणे यामुळे कुटूंबे उध्वस्त होतात. घटस्फोट होतात, मुले समाजात कुचेष्टेचा विषय होतात.

४. मानसिक व अध्यात्मिक दुष्परिणाम:

• व्यसनांमुळे मन बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक आरोग्य धोक्यात येते.

• व्यसनांची पूर्तता करण्यासाठी अनावश्यक खर्च होत राहतात आणि माणूस कफल्लक होत जातो.

• माणसाच्या शरीरातील तमोगुण (Negativity) भरपूर वाढत जातात आणि  वाढत जाणाऱ्या चुकीच्या भावना ह्या स्वच्छ विचार, निरागसता आणि वर्षानुवर्षे प्रयत्नपूर्वक असे कमावलेले संस्कार ही व्यसने मारून टाकतात.



• प्रसन्नता (Satisfaction) लयाला जाते आणि संशयीपणा, एकलकोंडेपणा, एक अनामिक भीती, स्वतःची लाज वाटणे असे अनेक त्रास उद्भवतात.

• या व्यसनांची सुरूवात कशी होते ?

• अनेक व्यसनांची  सुरूवात अगदी सहजपणे आणि मजा मस्तीत  होते.
• कधी उत्सुकतेने  काय आहे पाहुया म्हणत सहजपणे आस्वाद घेतला जातो.


• एकदा ट्राय करून पाहण्यात काय गैर आहे असे वाटून एकदा अनुभवलेली गोष्ट पुन्हा पुन्हा होत व्यक्ती स्वतःच्या नकळत त्या गोष्टीच्या आहारी जाते.
• आणि भानावर येईपर्यंत उशीर झालेला असतो.

• व्यसनांवर मात कशी करावी ?

• माणसाने स्वतः ला व्यसनापासून दूर ठेवण्या विषयी सतत जागरूकता बाळगावी.

• तसे न झाल्यास आपण व्यसनी होत चाललो आहोत हे सत्य स्विकारुन लपवून न ठेवता घरातील वडिलधाऱ्या मंडळींची नि:संकोच मदत मागावी.



• प्रकृती स्थिर असतानाच जागे होऊन स्वतःला त्या व्यसनापासून दूर ठेवण्याचा, योग्य ठिकाणी सल्ला घेऊन तो पाळण्याचा निर्धार करणे आवश्यक असते.

• व्यसन थांबवले की आयुष्य रिकामं, निरर्थक, कंटाळवाणं भासू शकतं. अशा वेळी एकटेपणा टाळून कुटूंबातील माणसां सोबत वेळ घालवणं, आवडती गाणी ऐकणं, पुस्तकं वाचणं, ध्यानधारणा करणं, सामाजिक कार्यकर्ते होऊन इतरांना मदत करणं हे उपक्रम करावेत.

• रोजच्या दिनचर्येत ध्यानधारणा (Meditation), श्वसनाचे व्यायाम, आसने इत्यादी गोष्टींचा आधार घ्यावा. मन शांत निवांत होत जाईल.

• A National Toll Free Drug Addiction Helpline Number: 1800-11-0031

• साभार: गुगलच्या सौजन्याने.


Comments