शारीरिक आरोग्य
कोरोना संसर्गजन्य आजार
• जानेवारी २०२५, पासून महाराष्ट्रात GBS च्या बातम्या सुरु झाल्या. पुण्यात या आजारामुळे काही मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. आज फेब्रुवारी २०२५ संपत आला तरीही ही संख्या वाढत चाललेली दिसून येते आहे. म्हणूनच आज पाहुया GBS या आजारा विषयी काही महत्त्वाची माहिती.
• GBS म्हणजे काय?
• GBS हा एक दुर्मिळ आजार आहे ज्यात माणसाची रोगप्रतिकारक शक्ती (Autoimmune System) शरीरातील सर्व नसांवर हल्ला करते. या नसांमध्ये मेंदू आणि पाठीच्या मणक्याशी जोडल्या गेलेल्या असंख्य नसा समाविष्ट आहेत. चेहरा, हातपाय शरीरातील सर्व नसांचा समावेश यात असतो.
• GBS ची कोणती लक्षणे प्रथम दिसून येतात ?
• या आजाराची सर्वप्रथम दिसणारी लक्षणे म्हणजे पाय सुन्न पडणे, पायांना मुंग्या येणे, पायात जोर नसणे. हळूहळू ही परिस्थिती शरीराच्या वरच्या दिशेने हातांमध्ये फैलावत जाते जी अखेर चेहऱ्यापर्यंत पोहोचते.
• ही लक्षणे सौम्य किंवा तीव्र कोणत्याही प्रकारची असू शकतात. फार गंभीर परिणाम दिसत असले तर अर्धांगवायू (Paralysis) ची देखील शक्यता उद्भवते.
• ही लक्षणे वाढत जाण्याचा कोणताही निश्चित कालावधी नाही. काही व्यक्तींना काही तासांमध्ये, काहींना काही आठवड्यांत ही लक्षणे वाढत चाललेली जाणवु लागतात.
• शक्यतो चार आठवड्यांमध्ये ही लक्षणे शिखरावर पोहोचलेली दिसून येतात.
• साधारणतः येणारे अनुभव:
१) हालचालींमध्ये असहजता (Uneasiness). उदा.चालणे, हात पाय हलवणे, चेहऱ्यावरील हावभाव या सर्व गोष्टी सहजपणे करता येत नाहीत असे जाणवते.
२) ह्रदयाचे ठोके वेगवान झालेले जाणवतात. (Fast Heartbeats).
३) मुत्राशयावर ताबा राहत नाही. (Urine get uncontrollable)
४) रक्तदाब कमी किंवा जास्त (High or Low Blood Pressure) अनुभवास येतो.
५) श्वासोच्छ्वास सहज न राहता, त्रासदायक होणे. (Breathing Discomfort)
६) गिळण्यास त्रास होणे.
७) दृष्टी अंधुक होणे. इत्यादी. (Blurry Eyesight)
• GBS कशामुळे उद्भवतो ?
• GBS होण्याचे कारण आजवर सापडलेले नाही. शास्त्रीय संशोधनानुसार हा आजार विषाणूंमुळे, अर्थात बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यामुळे सुरू होतो.
• डॉक्टरांना कधी भेटू ?
• आपण वर वाचले त्या पैकी कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपचार करत बसू नये. त्रास अंगावर काढू नये.
• या आजाराचे निदान करणे थोडे कठीण असते. कारण कारण हा आजार सुरूवातीला विविध माणसांवर विविध लक्षणे दाखवतो असे दिसून आले आहे. तसेच या आजाराचा प्रादुर्भाव होण्याचा वेग हा वेगवेगळ्या माणसांवर वेगवेगळा दिसून आला आहे.
• जर या आजाराचे सुरूवातीला निदान होऊन योग्य उपाययोजना सुरू झाली तर अर्थातच रूग्ण त्यातून लवकर बाहेर येऊ शकतो. बरा होऊ शकतो.
• अतिरिक्त माहिती
१) माणसे सहा महिन्यांत सहज चालु फिरू शकतात.
२) वर्षभरात स्नायू पुन्हा ताकद मिळवतात.
३) फार कमी जणांची रिकव्हरी उशिरा होते.
४) रूग्ण या आजारातून बाहेर पडला की पूर्ववत सामान्य आयुष्य जगतो.
५) यात बरेचदा न्यूमोनिया, रक्त संसर्ग (Blood Infection), श्वसनाचे त्रास, रक्ताच्या गुठळ्या किंवा ह्रदय विकाराच्या झटका येणे या कारणांमुळे सदर आजारात रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
• सावधगिरी कशी बाळगावी ?
१) वारंवार हात धुवा:
घरात किंवा घराबाहेर काहीही खाण्यापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुण्याची सवय लावून घ्यावी. हातावर लावण्यासाठी अल्कोहोल मिश्रीत सॉनिटायजर वापरा.
२) दररोज योग्य आहार घेत चला:
रोज स्वच्छ भाज्या, फळे, पालेभाज्या, डाळी, कडधान्ये, फळभाज्या, दही ताक लोणी तूप या गोष्टीचे नियमित सेवन करा. स्वच्छ पाणी प्या.
३) नियमित व्यायाम करा:
नित्यनेमाने व्यायाम करण्याची सवय असणाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक सहनशीलता भरपूर असते. अशा व्यक्ती हिंमतीने आलेल्या परिस्थिती सोबत लढा देऊन लवकर रिकव्हर होताना आढळतात. तेव्हा व्यायामाची नि:शुल्क (फ्री) सोबत भरपूर मदत देते.
४) ध्यानधारणा:
दररोज किमान १५ ते २० मिनीटे मनात सकारात्मक (Positive) भाव ठेवून केलेली ध्यानधारणा एका औषधा इतकी उपयोगी ठरते. तेव्हा रोज न चुकता थोडा वेळ या कामासाठी द्या. तणाव टाळण्यासाठी ही ध्यानधारणा प्रचंड फायदेशीर ठरते.
५) शांत झोप घ्या:
शरीराला, मनाला, बुद्धीला, विचारांना आराम मिळावा याकरिता ७ ते ८ तासांची शांत झोप घ्या. सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी आवर्जून उठा. स्वच्छ वातावरणातील ओझोन तब्येतीच्या अनेक तक्रारी सोडवेल हे निश्चित.
६) नियमित औषधे घ्यावीत:
• वेळेवर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे औषधे व पत्थ्ये प्रत्येक त्रासातून आपल्याला अलगदपणे बाहेर काढू शकतात तेव्हा तज्ञांचा सल्ला घेऊन पुढे जात रहावे हेच निरोगी जीवनासाठी सर्वोत्तम ठरते.
• आयुष्य हे सुंदर आहे ते जागरूकतेने आणि आपल्या प्रयत्नांनी आणखी सुंदर बनवुया. काळजी घ्या.
• आपण आपले अभिप्राय नोंदवावेत नम्र ही विनंती.
• शुभेच्छा.
• Thanks to google.com
Comments
Post a Comment