ध्यानधारणा आणि आरोग्य (Meditation and Health)

मानसिक आरोग्य 

ध्यानधारणा आणि आरोग्य (Meditation and Health)

• आनंदी जीवन जगताना "ध्यानधारणा" म्हटलं की काही तरी गंभीर विषय असल्या सारखे आपण चौकोनी चेहरा करून बसतो. जणू काही ध्यानधारणा ही फक्त योगी मुनीं सारखी अरण्यात जाऊन एकांतवास स्विकारूनच करावी लागणारी गोष्ट आहे. तेवढा वेळ आहे कोणाकडे  ? मी हा असा बिझी माणूस.


• पण जेव्हा हाच बिझी माणूस डोकेदुखी, ब्लड प्रेशर, मनस्ताप, चिडचिड, छातीत धडधड, अवसान गळालेला, अनेक औषधे मुकाट्याने गिळणारा आणि त्या सोबत नाईलाजाने घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे साइड इफेक्ट्स विनातक्रार भोगणारा हिरो मनुष्य एका कॉमन मॅन मध्ये रूपांतरित होतो. तेव्हा एक गोष्ट जादूची काठी फिरवावी तशी सहज या त्रासातून माणसाला अलगद बाहेर काढते. ती जादूची काठी म्हणजे "ध्यानधारणा ' (Meditation). आज आपण या जादूच्या काठी सोबत परिचय करून घेऊया :


ध्यानधारणा म्हणजे काय? (Meditation)
ध्यानधारणा म्हणजे आपले मन केवळ एकाच गोष्टीवर केंद्रित करणे. फक्त आणि फक्त वर्तमानकाळात  उपस्थित असणे.

ध्यानधारणा का केली जाते?कॅनडा क्वीन्स विद्यापिठाच्या संशोधनानुसार माणसाच्या मनात दररोज ६,००० (सहा हजार) विचार येतात.

• यातील ८०% विचार हे नकारात्मक असतात, जे मोठ्या प्रमाणावर नुकसान देतात. आणि म्हणूनच मन नियंत्रित करण्यासाठी ध्यानधारणा ही एक उत्तम उपचाराची पद्धत डॉक्टर्स आणि काऊन्सिलर्स नेहमीच सुचवतात.

ध्यानधारणेचे फायदे काय होतात ?

१. तणाव व्यवस्थापन:

√ ध्यानामुळे मन शांत निवांत झालेले जाणवते, जे दिर्घकाळ राहते.
√ मनातील तणावाची तीव्रता हळूहळू कमी होत जाते.
√ अनेक त्रासांतून  सुटका होऊन मन:शांती  मिळते.


२. एकाग्रता आणि स्मरणशक्ती:

√ ध्यानधारणा मेंदूची एकाग्रता वाढवते.
√ एकाग्रतेमुळे स्मरणशक्ती वाढते.
√ विस्मरणाचा त्रास सहज दूर करता येतो.

३. भावनांवर नियंत्रण:

√ चंचल अस्थिर मन, स्थिर होत जाते.
√  भावनांवर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होते. 
√   राग, चिडचिड, संताप, मनस्ताप नियंत्रणात राहतात.


. शांत निवांत झोप:

√ मन निर्धास्त होऊन विचारहिन गाढ झोप घेते.
सकाळी उठल्यावर होणारी डोकेदुखी, चिडचिड टळते.
√ सकाळी  मनाची प्रसन्नता स्पष्ट जाणवते.

५. आत्मविश्वास वाढतो:

√ अविश्वसनीय आत्मविश्वास सहज जाणवत राहतो.
√ अनेक प्रश्नांची उकल करता येते, मार्ग सापडतो.
√ सकारात्मक प्रवृत्ती (Positiveness) साथ देते.

६. रक्तदाब नियंत्रण:

√ रात्रभर शांत निवांत झोप रक्तदाब नियंत्रणात आणते.
√ ह्रदयाचे आरोग्य निरोगीपणे कार्य करत राहते.
√ ह्रदय विकार उद्भवत नाहित, असल्यास आराम पडतो.


७.  उत्तम प्रतिकारशक्ती:

√ नियमित ध्यानधारणा प्रतिकारशक्ती उत्तम ठेवते.
√ लहान सहान आजार सहज कमी होतात, बरे होतात.
√ शरीर व मन निरोगी व प्रसन्न होत जाते

८. आनंदी जीवन:

√ मन आनंदात रहायला शिकते.
√ आपले नातेसंबंध सुधारतात.
√ जीवन सुखी समाधानी होत जाते.



ध्यानधारणेचे  विविध प्रकार कोणते ?

१. मार्गदर्शित ध्यानधारणा 

√ शिक्षकांनी शिकवताना करण्याचे ध्यान.
√ रेकॆर्डिंग ऐकत करण्याचे ध्यान.

२. मंत्र ध्यान

√ छोट्या किंवा एकाक्षरी मंत्राचे मनातल्या मनात उच्चार करत केले जाणारे ध्यान.

३. माइंडफुलनेस ध्यान:

√ एका शांत जागेवर बसून श्वासावर लक्षं केंद्रित करून केले जाणारे ध्यान.
√ शरीराच्या व मनाच्या सूप्त  संवेदनांची जाणीव करून घ्यावी.

४. श्वासोच्छ्वास ध्यान:

√ हे नवशिक्यांसाठी योग्य ध्यान आहे.
√ यात फक्त श्वास भरणे आणि सोडणे केवळ यावरच लक्षं केंद्रित करायचे असते.
√ ही सगळ्यात सुलभ पद्धत असून याकरिता वेगळ्या प्रशिक्षणाची आवश्यकता नसते.

सारांश:

• रोज ठराविक वेळी नियमितपणे ध्यानधारणा करत जावी.
• सुरूवातीला फक्त १० मिनीटे ध्यानधारणा करायला सुरुवात करावी.
• हळूहळू वेळ वाढवत ती २० मिनीटां पर्यंत न्यावी.
• फायदे मिळवण्यासाठी रोज ध्यानधारणा करण्याची
 नियमितता ठेवावी.
• लवकरच यातील फायदे सहज दिसायला सुरुवात होत जाईल.
• सुरूवात करण्याआधी फक्त आठ दिवसां करिता ध्यानधारणा आपल्या दैनंदिन कामाच्या वेळापत्रकात नोंदवुया. त्याचे फायदे ताबडतोब दिसून येतील, ध्यानधारणा आपल्या दररोजच्या दिनक्रमात मानाचे स्थान नक्कीच मिळवेल.

• निरोगी  मानसिक आरोग्यासाठी अनेक शुभेच्छा.🌹

Comments