गरम मसाला व आरोग्यदायी फायदे (Warm Spices and Health Benefits)

 शारीरिक आरोग्य 


गरम मसाला व आरोग्याचे लाभ

• भारतीय जेवण संपूर्ण विश्वात जेवणातील पदार्थांचा चविष्टपणा, विविधता,आकर्षकता आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी तत्वांनी भरपूर या विविध गोष्टीं करिता प्रसिद्ध आहे. विदेशी स्त्री पुरुष भारतात आल्यावर इथल्या पारंपरिक पदार्थां करिता आवर्जून प्राधान्य देतात.

• आज आपण चटक मटक पदार्थ बनवण्या करिता वापरात येणाऱ्या गरम मसाल्याच्या घटकांची आरोग्याच्या विषयी कोणती भूमिका आहे हे एकदा समजून घेऊया.

१) लवंगा (Cloves):

✓ लवंगांमध्ये असणारे ऍंटीऑक्सिडेंटस शरीरातील मुक्त रॅडिकल्स सोबत लढण्यासाठी मदत करतात.
✓ संधिवातापासून आराम मिळतो.
✓ दातदुखी कमी होते.
✓ रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
✓ रक्तदाब नियंत्रणात राहतो.


✓ दात निरोगी राहतात.
✓ हाडांचे आरोग्य उत्तम रहाते.
✓ पोटात अल्सर होण्यास प्रतिबंध होतो.
✓ यकृताच्या आरोग्यास उपयोगी ठरते.
✓ संसर्गजन्य रोगांपासून सुटका होते.

२) काळीमिरी (Black Pepper)

✓ काळीमिरी मध्ये असणारे मॅंगेनीज हे हाडांसाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, पचन सुलभतेने होण्यासाठी उपयोगी ठरतात.
✓ यात कफनाशक गुणधर्म असल्याने सर्दी, खोकला दूर करते.
✓ दमा, ब्रॉंकायटिस इ. श्वसन विकारांवर परिणामकारक ठरते.
✓ मधुमेह नियंत्रणात आणते.
✓ उच्च रक्तदाब व्यवस्थापन करते.


✓अन्नपचन सोपे करते.
✓ आतड्यांमधील कोलेस्टेरॉल कमी करते.
✓ अतिरिक्त चरबी, लठ्ठपणा नष्ट करते.
✓ दृष्टीदोष दूर करण्यासाठी सहायक ठरते.
✓ तणाव व्यवस्थापन करते.

३) तमालपत्र (Bay Leaf)

✓ पचन सुधारते, पचना संबंधीत आजार दूर होतात.
✓ बद्धकोष्ठता दूर करते.
✓ कोलेस्टेरॉल पातळी कमी करते ह्रदय विकाराचा धोका दूर करण्यासाठी मदत करते.
✓ घशाचे, श्वसनाची संबंधित विकार कमी होतात.
✓ हिरड्या मजबूत होतात, या करिता काही माणसे या पावडरने दात घासतात.


✓ भुकेवर नियंत्रण ठेवते वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.
✓ श्वसनतंत्र सुरळीत ठेवते. फ्लू, इन्फ्लूएन्जा, खोकला यावर उपयुक्त ठरते.
✓ मधुमेहाच्या रूग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यासाठी मदत करते.
✓ किडनी स्टोन व इतर गॅस्ट्रीक विकारांचा त्रास कमी होतो.
✓ ग्लुकोज ची पातळी नियंत्रणात राहते याचा मधुमेही रूग्णांना फायदा होतो.

३) दालचिनी (Cinnamon)

✓ दालचिनी पचन सोपे करते.
✓ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.
✓ वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
✓ संधीवातासारख्या आजारांमध्ये उपयोगी पडते.
✓ दिर्घकाळ चालणाऱ्या आजारावर उपयोगी असते.

✓ दाहक-विरोधी गुणधर्मामुळे तणावग्रस्त स्नायू आणि डोकेदुखी बरे होतात.
✓ मायग्रेन आणि गंभीर दिर्घ कालीन डोकेदुखीवर परिणाम कारक ठरते.
✓ मुरूमांवर नियंत्रण ठेवते.
✓ कोलेस्टेरॉल कमी करते.

) जायफळ (Nutmeg)

✓ जायफळ ह्रदय विकारांपासून बचाव करू शकतं.
✓ हाय कोलेस्टेरॉल व हाय ट्रायग्लिसाइडचं प्रमाण कमी करू शकतं.
✓ रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करतं
✓ मुड स्विंग उत्तम ठेवतं
✓ उदासिनतेवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरतं.


✓ याची पावडर इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावली तर इन्फेक्शन झालेल्या ठिकाणची जखम व इन्फेक्शन दूर होतं.
✓ पचनशक्ती चांगली विकसित करतं.
✓ गळ्यात व्हायरस किंवा बॅक्टेरिया चिपकुन राहतात आणि तोंडाला दुर्गंध येतो. हा दुर्गंध जायफळ दूर करतो.
✓ यातील ऍंटीफंगल गुण व्हायरसच्या हल्ल्यापासून शरीराचं रक्षण करतो.

• यातील प्रत्येक घटकावर सविस्तर लिहायचं म्हणजे एक ग्रंथ तयार होईल. भारतात आपल्या हिंदू धर्मात अन्न प्राशन करण्याआधी भरलेल्या ताटाला याच करिता नमस्कार करण्यात येतो.  कारण हेच अन्न आपल्याला जगवतं, वाढवतं, संरक्षण देतं आणि आपल्यावर उपचारही करतं.



• म्हणून, जेव्हा आपण समाजात वावरताना आपल्या व्यक्तिमत्वाला आदर मिळेल, आपल्या निरोगी रूपाचं कौतूक होईल, सुदृढता, निरोगीपणा, सहनशीलता, प्रतिकारशक्ती यांच्या कसोटीवर आपण खरे उतरू तेव्हा कायम आठवुया  या सगळ्याचं श्रेय आपल्या पाठीशी सतत उभ्या असणाऱ्या डाळी, धान्यं, भाज्या, मसाले  यांना जातंय. खंबीर सैनिका सारखे ते आपल्या सोबत प्रत्येक त्रासासोबत लढताहेत. जास्तीत जास्त लाभ सहजगत्या देत आहेत. केवळ आपल्या संरक्षणासाठी.

• धन्यवाद. 🌹


धन्यवाद: गुगलच्या सौजन्याने.

Comments