मनस्तापाचा हल्ला (Depression Attack)

मानसिक आरोग्य 

 पॅनिक अटॅक 


पॅनिक अटॅक म्हणजे काय ?

✓पॅनिक अटॅक म्हणजे मनातील काळज्यांचे आपल्या मनावर आणि शरीर यंत्रणेवर वारंवार होणारे हल्ले. जे कधीही अचानक सुरू होतात.

मन अतिशय चिंताग्रस्त व बेचैन होत जाते. काहीतरी वाईट घडणार आहे अशी भीती एकसारखी वाटत राहते.  

विनाकारण अस्वस्थता बेचैनी अचानक भासू लागते आणि ती सतत वाढतच राहते.                           

✓ह्रदयाची धडधड सुरु होऊन वाढत जाते.   खूप  भीती वाटत राहते.

✓छातीत दुखायला लागणं, जड वाटणं अशी प्रमुख लक्षणे दिसून येतात.

✓ दहा मिनिटे ते अर्धा तास हे अटॅक टिकतात.

✓ झपाट्याने तीव्र होत होत ते अचानक कमी होत जातात.


पॅनिक अटॅक आजार कशामुळे उद्भवतात ?

 कौटुंबिक पार्श्वभूमी: कुटुंबातील भावंडे, पालक यांपैकी कुणाला सदर त्रास असल्यास बरेचदा ते पुढच्या पिढीत आलेले आढळतात.

✓ चिंता, नैराश्य, एकटेपणा किंवा इतर मानसिक त्रास असणाऱ्यांना हे पॅनिक अटॅक येण्याची शक्यता जास्त असते.

✓ बालपणी दिर्घकाळ नकारात्मक अनुभवांतून जावे लागणे बरेचदा पॅनिक अटॅक आणि पॅनिक डिसऑर्डर हा त्रास  निर्माण करू शकते.

✓ रजोनिवृत्ती (monopaus) पाळी येणे बंद होणे) नंतर हार्मोन्स मध्ये होणाऱ्या बदलांमुळे हा त्रास होऊ शकतो.

✓ हा त्रास किशोरवयीन मुलांमध्ये किंवा प्रौढपणाची सुरूवात होत असताना सुरू झालेला आढळून येतो.

✓ विशेषतः लहानपणी मानसिक आघात सोसावा लागला असण्याची शक्यता या आजारात असू शकते.

✓ पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात असलेला दिसून येतो असे शास्त्र सांगते.


पॅनिक अटॅकची लक्षणे कोणती ? 

पॅनिक अटॅकची लक्षणे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची दिसून येतात 

✓ छातीत धडधड सुरु होते. कधी कधी ह्रदय अतिशय वेगाने धडधडताना जाणवते.

✓श्वास घ्यायला त्रास होतो किंवा जोरजोरात श्वासोच्छवास करावा लागतो.

✓ छातीत दुखणे, धडधड वाढत जाणे, भीती वाढत जाणे, अंग थरथरणे असे अनुभव जाणवतात.

✓ घाम फुटतो, थकवा जाणवतो, डोके फार गरगरते, घाबरे घुबरे व्हायला होते. कधी कधी अपचन, मळमळणे अशी शारीरिक लक्षणे ही दिसून येतात.


पॅनिक अटॅक कसा नियंत्रणात आणायचा ?

✓ खोल श्वासोच्छवास (Deep Breathing)

ह्रदयाची धडधड कमी होण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी खोलवर श्वास घेणे आणि हळूहळू सोडणे याचा नियमित सराव करावा. मन शांत होते.

✓ रोज आठवणीने कमीत कमी १० मिनीटे डोळे मिटून श्वासावर लक्षं केंद्रित करून ध्यानधारणा करावी. मन शांत निवांत होईल.

 नियमितपणे व्यायाम (Regular Exercise)

✓ हात, पाय, मान, मनगटे यांच्या स्नायूंना लवचिकता कायम राखण्यासाठी साधे सोपे व्यायाम देत रहावे.

✓ फक्त आणि फक्त सकारात्मक (Positive) विचार करण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी. आपले काम पूर्ण झाले आहे, मनासारखे होत आहे असे एखादे कल्पना चित्र रोज पहायला सुरुवात करावी.

मन हलके करा (Relax your mind)

✓ अगदी रोज आठवणीने  आपल्या दिनक्रमाचा किमान अर्धा तास डायरी लेखनासाठी द्यावा. डायरीत आपले मन मोकळे करावे. 

✓ डॉक्टरांच्या मदतीने पुढे जावे.

काय काळजी घ्यावी ?

परिपूर्ण आहार (Dietary Food)

✓ रोजच्या जेवणात ज्वारी किंवा बाजरी यांची भाकरी, कडधान्ये, पालेभाज्या, कच्च्या कोशिंबीरी हे घटक आवर्जून असावेत.

✓ उन्हाळ्यात दही व दह्याचे पदार्थ तसेच थंडी पावसाळ्यात आवर्जून सुप्स व उष्ण पदार्थ यांचा आहारात समावेश करावा.


✓ रोजची जेवण्याची वेळ निश्चित असावी. बाहेरचे खाणे शक्यतो टाळावे.


छंद लावून घ्यावा (Accept Hobbies)

✓ छंद नसला तरीही एखादा छंद नक्की लावून घ्या. मग ते वाचन असो किंवा गाणी ऐकणे असो, झाडांच्या सहवासात रमणं असो किंवा आपण घरात पाळलेल्या प्राण्याची मनापासून काळजी घेणं असो. दररोज तासभर एक छंद जोपासा. मन प्रसन्न होईल.

काहीतरी करत रहा  (Always Do something)

✓ स्वतः ला रिकामे ठेवु नका. सतत काहीतरी करत रहा. गेम खेळा, शब्दकोडी सोडवा टि.व्ही पहा किंवा छान गप्पा मारा. 

✓ निसर्गाचं निरिक्षण करा. पक्ष्यांचं निरिक्षण करा. त्यांची जगण्या करिता चालणारी धडपड पहा आणि त्यांचं आनंदी जीवनाचं  तंत्र समजून घ्या.

✓ दुसऱ्याचं दु:ख समजून घ्या, इतरांना दोष देणं नाव ठेवणं सोडून द्या. माणूस आहे, कधीतरी चुकणार समजून घ्या आणि सोडून द्या. आपला झालेला अपमान, धोका सगळ्या आठवणी आकाशात सोडून दिल्याची कल्पना करा. की यापुढे माझा त्या कटू आठवणींशी आणि त्या आठवणी देणाऱ्या माणसांशी कोणत्याही प्रकारे भावनिक संबंध नाही. हे स्वतः ला बजावून सांगा.

काऊन्सिलर्सना भेटा

✓आपले मानसिक आरोग्य सुंदरतेने जपण्यासाठी काऊन्सिलरची मदत घ्या. नियम, मार्गदर्शन अचूकपणे पाळा. आपल्या अडचणी इतरांना सांगण्याची सवय सोडून द्या.

✓ घरगुती औषधे आणि काढे यांवर विसंबून रहायचे आणि हाताबाहेर गेल्यावर डॉक्टरांकडे धाव घ्यायची ही वाईट सवय सोडून शक्य तितक्या लवकर डॉक्टर आणि काउन्सिलर्सची मदत घ्या आणि नव्या निर्धाराने पुढे चला.

शुभेच्छा: 

• माणसाचं मन ही त्याची एक सतत सोबत करणारं एक  नैसर्गिक नातं आहे. त्याला  समजून घ्यायचं सोडून आपण  त्याला सतत दोष देत राहतो आणि त्याचे कडून भरमसाठ  अपेक्षा कायमच ठेवत राहतो. आपलं आपल्या मना करिता असणारं कर्तव्य आपण छानपैकी हेतुपुरस्सर विसरतो. इथे आपणच आपल्या मनाला नीट समजून घेणं आवश्यक आहे. मग करणार नं हे बदल ?

• सुंदर आरोग्याच्या सुंदर शुभेच्छा.


गुगलचे आभार.

Comments