अत्यंत पोषणदायी (Extremely Nutritious Halim)

 शारीरिक आरोग्य 


आरोग्यदायी अळीव

• अळीव म्हणजे काय?
 अळीव  अहाळीव, हळीव, हलीम, गार्डन क्रेस सिड्स (Garden Cress Seeds) विविध नावांनी प्रसिद्ध असणारे हे एक तेल बियाणे आहे.

• अळीव गरम आहे की थंड ?
✓ अळीव निसर्गतः गरम प्रकृतीच्या असतात व आपल्या शरीरातील उष्णता वाढवू शकतात.
✓आणि म्हणूनच थंडी, पावसाळ्यात मर्यादित प्रमाणात याचे आवर्जून सेवन केले जाते .
 
• अळीवामध्ये कोणती पोषक मूल्ये आढळून येतात
 
 १. फायबर - (फायबरचे फायदे)
• पचनासाठी उपयुक्त असणारे तंतूमय पदार्थ यात असतात. ज्यामुळे दररोज पोट सहजपणे साफ होते. 

२) कार्बोहाइड्रेटस - (कार्बोहाइड्रेटसचे फायदे) 
• मेंदू, स्नायू व इतर अवयवांच्या योग्य कामासाठी  ही उर्जा उपयुक्त ठरते
• खेळाडूंसाठी महत्वपूर्ण पोषकतत्वे यात असतात.
 • यातून, मेंदूचे कार्य सहजपणे चालते.
• एकाग्रता, विचारशक्ती  स्मरणशक्ती करिता योग्य.      
• बद्धकोष्ठता टळते वजन नियंत्रणात ठेवता येते, ह्रदयाचे आरोग्य अतिशय उत्तम रित्या चालते.

३) फॅटस - (फॅटसचे फायदे)
• फॅट्स शरीराला ऊर्जा देतात, मेंदूचा मोठा भाग फॅट्सने बनलेला असतो. ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी ऍसिड्स मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.
• फॅट्स शरीरातील हार्मोन्सचे उत्तम संतुलन ठेवतात. 
(Harmonal Balance)
• फॅट्सच्या पोषणामुळे त्वचा अत्यंत मुलायम, चमकदार होते. केसगळती थांबते, केस चमकदार होतात.
• स्त्रियांचे मासिकपाळीचे  सर्व त्रास संपुष्टात येतात आरोग्य उत्तम राहते.
• फॅट्समुळे पचन उत्तम सुधारते, पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे विनाकारण सतत खात रहाण्याच्या सवयीला आळा बसतो. जेणेकरून वजन नियंत्रणात रहाते.

अळीवात असणारे  महत्त्वाचे घटक पुढे दिलेले आहेत. त्याविषयी सविस्तर लिहायचे ठरवले तर इथे आपला एक ग्रंथ तयार होईल. हे उर्वरित घटक आहेत....

४) प्रथिने. ५) पोटॅशियम. ६) फॉस्फरस. ७) कॅल्शियम. 
८) सोडिअम. ९) नियासिन. १०) व्हिटॅमिन सी. 
११) झिंक. १२) लोह. १३) व्हिटॅमिन ए. १४) टोटल फिनॉल्स १५) टोटल फ्लाटोनॉइडस

अळीवात असणारे हे इतर गुणधर्म आहेत जे आपल्याला आरोग्यवान ठेवतात. 

•हलीय बियांचे इतर संभाव्य फायदे कोणते आहेत ?

१) मधुमेहासाठी उपयोगी :
✓ हलीम बिया इन्सुलिनच्या निर्मितीमध्ये अडथळा आणतात, ज्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करू शकतात.

२) हाडांचे आरोग्य :
✓हलीम बियांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडे बळकट होणे व फ्रॅक्चर झाल्यास उपचारा दरम्यान अतिशय उपयुक्त ठरू शकतात.

३) स्थूलतेवर प्रभाव :
✓हलिम बियांमध्ये असणाऱ्या फायबरमुळे जेवणानंतर पोट भरपूर भरल्या सारखं वाटतं आणि फायबरचं पचन खूप हळूहळू होतं. अर्थातच खाणं माफक प्रमाणात होतं. या क्रियेसाठी शरीर चरबी वापरतं. वजन नियंत्रणात राहून चरबी कमी होते.
✓ हलीम बिया रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात ज्यामुळे इन्सुलिन रेसिस्टन्स कमी होतो आणि वजन कमी करणे सोपे होते.
✓ यात असणारे ऍंटी ऑक्सिडंट्स शरीरातील मेटाबॉलिक (चयापचय क्रिया) सुधारतात जेणेकरून शरीरातील कॅलरीज भराभर जळतात आणि वजन घटते 

४) इतर फायदे:
✓ मेंदूची कार्यक्षमता वाढते.
✓मासिकपाळीत नियमितता येते.
✓ अपचन होणे टळते.
✓ अशक्तपणा येत नाही.

• अळीव बियांचा वापर कसा करावा ?
✓ सूप्स, कोशिंबीर, स्मूदी इ. मध्ये घालून.
✓ भाजून किंवा कडधान्यांप्रमाणे भिजवून व मोड काढून खाव्यात.
✓ रात्री १ चमचा अळीव पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपोटी पिणे.
✓ अळीवाचे लाडू, खीर इ. पदार्थ बनवून खाणे.

सूचना:  दररोज नित्य नेमाने काही औषधे सुरू असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने  हे घेणे आवश्यक.

• काळजी व दक्षता: 
✓ गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ति, स्तनपान करणाऱ्या माता, लहान मुले यांच्याकरिता अळीव बिया कितपत उपयुक्त आहेत या विषयी माहिती उपलब्ध नाही तेव्हा सदर व्यक्तिंनी हे उपाय टाळावेत. कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती.

✓ कोणताही घटक एका मर्यादेपर्यंतच फायदेशीर असतो. अती सेवन केल्यास तीच गोष्ट जीवघेणी ठरू शकते. आणि म्हणूनच अळीवाचे विनाकारण अतिरिक्त सेवन आवर्जून टाळावे.

• कोणत्या परिस्थितीत अळीव टाळावा ?
✓ अळीव बिया रक्तदाब कमी करतात आणि म्हणून ऑपरेशनच्या आधी त्या घेणे टाळावे.
✓ अळीव बिया हार्मोन्स कमी करतात त्यामुळे हायपोथायरॉइडिझममध्ये याचे सेवन निषिद्ध आहे. 
✓ अळीव बिया रक्तदाब कमी करतात आणि म्हणूनच रक्तदाबाची (Blood pressure) औषधे सुरू असल्यास या बिया डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय खाऊ नयेत अन्यथा रक्तदाब प्रमाणाबाहेर कमी होण्याची शक्यता वाढते.

निरोपआपण शरीराला आवश्यक सगळी जीवनसत्त्वं खाणं रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात  आपल्या नकळत दुर्लक्षित ठेवतो. आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या की आपण जागे होतो. तेव्हा वेळीच आपली काळजी घेणं निरोगी जीवनासाठी  अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच अनेक त्रास टाळण्यासाठी, त्रास नियंत्रणात ठेवण्यासाठी नित्यनेमाने अळीव सोबतीला घेऊन निरोगी जीवनाचा प्रवास पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करूया. 

• स्वच्छ, निरोगी जीवनासाठी अनेक शुभेच्छा. ♥️
• सदर माहिती बद्दल गुगल,  विकीपिडियाचे   आभार 🙏

Comments